मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण

कल्याण :

मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे

ताजी घटना कल्याण पूर्व भागातील टिळक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. काही तरुणांनी एका व्यक्तीला मोबाईल चोरीच्या संशयावरुन बेदम मारहाण केली. कैलास नेवारे असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरुन मारुफ पोके आणि आसिफ शेख या तरुणांनी कैलासला मारहाण केली. कैलासने वारंवार त्याने चोरी केलेली नसल्याचं सांगितलं, तरी देखील 4 आरोपींनी त्याला मारहाण करुन रक्तबंबाळ केलं.

अखेर पीडित व्यक्ती मरेल या भितीपोटी ते स्वतः त्याला रस्त्यावर घेऊन आले. पोलिसांच्या मदतीने पीडित तरुणाला रिक्षात टाकून रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी टिळकनगरचे पोलीस निरिक्षक नारायण जाधव म्हणाले, “चोरीच्या संशयावरुन चार तरुणांनी कैलासला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मारुफ आणि आसिफला अटक करण्यात आली आहे. अद्याप दोन आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट