नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 12, 2021
- 587 views
कल्याण ।। कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महापालिकेच्या प्रभागक्षेत्रात काही दुकाने व मॅरेज लॉन्स या पूर्वी सील करण्यात आले होते. आजही सदर आदेशाच्या अनुषंगाने क प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी झुंझाराव मार्केट मधील सुरू असलेली 4 दुकाने आणि लक्ष्मी मार्केट मध्ये सुरू असलेले 1 दुकान आज सील केले. त्याचप्रमाणे बाजापेठेत सुरु असलेली साड्यांची 2 दुकाने सील केली. आय प्रभागातही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी नंदिवली रोड येथील सुरू असलेले 1 इलेक्ट्रिक दुकान व 1 भांड्याचे दुकान सील करण्याची धडक कारवाई आज केली.
रिपोर्टर