नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई

कल्याण ।। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक‍ शिंदे यांनी चिंचपाडा रोड येथील 1 इलेक्ट्रॉनिक्स दुकान व कपडयाचे 2 गोडाऊन सील केले.फ प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी 90 फिट रोड लगतचे सुरु असलेले 1 गादीचे दुकान व चोळेगांव ठाकुर्ली येथील 1 गादीचे दुकान आज सील केले. महापालिकेच्या नागरिकांनी नियमांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.


सार्वजनिक ठिकाणी कच-यामध्ये मेडिकल वेस्ट टाकणा-या साई डेंटल क्लिनिकचे डॉ.उपाध्ये यांचेकडून रु.10,000/- चा दंड वसूल 


कल्याण ।। कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्वच्छता गृहासमोर कच-यात पीपीई किट, मास्क, इंजेक्शन सापडले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे अशा आशयाच्या बातम्या सोशल‍ मिडियावर प्रसिध्द झाल्या आहेत. सदर बाबतीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदार कोकरे आणि प्रभारी आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे यांनी समक्ष पाहणी करुन संबंधित साई डेंटल क्लिनिकचे डॉ. उपाध्ये यांनी मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्यामुळे त्यांच्याकडून रुपये 10,000/- चा दंड वसूल केला आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट