नागरिकांच्या सोयीसाठी आता प्रभाग कार्यालयातही जनता दरबाराचे आयोजन

कल्याण ।। नागरिकांना त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या  सोयीसाठी, त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरेने करणेकामी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करणेसाठी आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी सदर दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

सदर जनता दरबाराची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.

1/अ प्रभाग –बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय

2/ब प्रभाग – गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00  –  2/ब प्रभाग कार्यालय

3/क प्रभाग – मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय

4/जे प्रभाग - बुधवार–दुपारी 4.00 ते  5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय

5/ड प्रभाग – बुधवार–दुपारी  3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय

6/फ प्रभाग –बुधवार –दुपारी  3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय

7/ह प्रभाग - गुरुवार-दुपारी  3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय

8/ग प्रभाग – गुरुवार – दुपारी  4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय

9/आय प्रभाग –गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय

10/ई प्रभाग – शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय

सदर जनता दरबाराचा प्रारंभ पुढील आठवडयापासून होणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट