कोविडच्या प्रादुर्भाव रोखण्याकरीता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना

कल्याण :

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रातील कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्याकरीता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या हॉटेल/रेस्टारंट/बार या ठिकाणी मोठया प्रमाणात ग्राहक येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी कार्यरत कर्मचा-यांपैकी एखादा कर्मचारी कोविड बाधित असल्यास, अशा कर्मचा-यांमार्फत सदर ठिकाणी येणा-या ग्राहकांनाही कोविडची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल/रेस्टॉरंट/बार येथील कार्यरत कर्मचा-यांची कोविड चाचणी होणे आवश्यक आहे. ज्यामुळे वेळीच कोविड आजाराचे निदान होईल तसेच संबंधित कर्मचा-यांना तातडीने उपचार उपलब्ध करणे सोयीचे होईल व परिणामी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल/रेस्टारंट/बार यांनी त्यांचे हॉटेल/रेस्टारंट/बार येथे कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांची पुढील 7 दिवसाचे आत स्वखर्चाने तातडीने कोविड चाचणी करण्याबाबत तसेच त्यांची कोविड चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल *moh.kdmc@gmail.com या ई-मेलवर* पाठविण्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केला आहे.

त्याचप्रमाणे सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल/रेस्टारंट/बार या ठिकाणी भेट देवून तेथील कार्यरत *कर्मचा-यांची RTPCR कोविड चाचणी करण्यात आली आहे किंवा नाही* याची खातरजमा करावी आणि जे सर्व हॉटेल/रेस्टारंट/बार हे सदर आदेशाची अंमलबजाणी करणार नाहीत अशा सर्व हॉटेल/रेस्टारंट/बार हयांचेविरुध्द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही सदर आदेशात नमुद करण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट