कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या वाढदिवशी हाणामारी आणि गोळीबार

कल्याण :

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पूर्वेतील नगरसेवक नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त चक्कीनाका परिसरात काल रात्री १२ वाजता शेकडो कार्यकर्ते जमले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर नवीन गवळी हे त्यांच्या घरात गेले. 

त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे जण आले. निलेश गवळी याचे काही महिन्यापूर्वी जगदीश राठोड नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. निलेश व जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना निलेश सोबत आलेल्या महेश भोईर यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान महेशने आपल्या जवळ असलेली लायसन्स रिव्हॉल्वर काढली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली या झटापटी   दरम्यान एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला लागली. गोळीचा आवाज येताच परिसरांमध्ये एकच गोंधळ उडाला व लोकांमध्ये पळापळ सुरू झाली.

सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीतहानी झालेली नाही. कोळशेवाडी पोलीस यांनी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट