मनपा आयुक्त यांचे दालनात कोविड बाबत करावयाच्या उपाययोजने संदर्भात बैठक

कल्याण ।। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समवेत महापालिका आयुक्त यांचे दालनात कोविड बाबत करावयाच्या उपाययोजने संदर्भात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत वाढत्या रुग्ण संख्येसंदर्भात बराच उहापोह करण्यात आला. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण त्वरेने होणे आवश्यक असून त्याकरीता केंद्राकडून महाराष्ट्र शासनास होणा-या लसीच्या पुरवठयात वाढ होणे गरजेचे आहे असे उद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत काढले. महापालिकेत Contact Tracing वाढविणे गरजेचे असल्याबाबत प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले असता सध्या नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांमार्फत Contact Tracing केले जाते, 200 जणांची Contact Tracing साठी नेमणूक केली जाईल, सर्व्हेसाठी Outsourcing करुन स्पेशल टिम तयार केली जाईल तसेच पालिका सदस्यांच्या सहभागाने कोरोना दक्षता समिती कार्यान्वित केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

महापालिकेत प्रतीदिन 2000-2200 इतके लसीकरण होत असून सध्या 06 शासकीय ठिकाणी व 09 खाजगी रुग्णालयात लसीकरण केले जाते अशी माहिती वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी यावेळी दिली.

पॉझिटीव्ह रुग्ण न सांगता घराबाहेर फिरतात, तसेच ज्येष्ठ नागरिक कोमॉर्बिड असल्याचे सांगत नसल्यामुळे रुग्णसंख्या वाढीस हातभार लागत असल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली असता याकामी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्‍यावे अशी सुचना आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली. त्यावर नगरसेवकांचा WhatsApp ग्रुप करुन तो नागरी आरोग्य केंद्राशी Attach ठेवावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत रुग्ण सापडतील तेथे पोलिसांमार्फत एका व्हिजीटची व्यवस्था करावी अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलिस उप आयुक्त विवेक पानसरे यांना दिल्या. तसेच खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना कोविड साथीसाठी महापालिकेस जास्तीत जास्त सहयोग देणेबाबत पत्र आरोग्य विभागामार्फत दिले जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.

सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलिस उप आयुक्त विवेक पानसरे यांचेसह माजी पालिका सदस्य विश्वनाथ राणे, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, महापालिका वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट