मालमत्ता कराची विक्रमी वसूली करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वर्गांचा महापालिका आयुक्त यांचे हस्ते सत्कार
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 09, 2021
- 342 views
कल्याण ।। गेले वर्षभर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी अथकपणे आणि नेटाने कोविड साथीचा मुकाबला करत असताना, महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण रु. 427.50 कोटी विक्रमी वसूली केली .आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासातील करसंकलन विभागातील ही सर्वोच्च वसुली आहे. महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या बाबीची दखल घेऊन महानगरपालिकेचे करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी, करवसुलीत मोलाचा हातभार लावणारे महानगरपालिकेचे दहा प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच सदर प्रभागातील करवसुली अधीक्षक आणि प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट वसुली करणारे दोन कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला . कर्मचारी वर्गाने केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनीकेलेल्या सत्कारामुळे कामाचा हुरूप वाढल्याची प्रतिक्रिया कर्मचारी वर्गाने व्यक्त केली तसेच आयुक्त यांचे आभार मानले.
रिपोर्टर