आता कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ग प्रभागात 4 दुकानांकडून बिस हजार रु. दंड वसूल

कल्याण ।। महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार ग प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे व त्यांच्या पथकाने आज ग प्रभागातील किंग्स मोबाईल, मानपाडा रोड, एजेल नोवेल्टी, मानपाडा रोड, क्लासिक कलेक्शन, मानपाडा रोड, कॉस्ट प्राईझ,मानपाडा रोड, डोंबिवली, पूर्व या 4 दुकानांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचेकडून प्रत्येकी रु. 5000/- प्रमाणे रू. 20,000/- ( अक्षरी वीस हजार रूपये मात्र) इतका दंड वसूल केला आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट