
डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर चौकातले अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 09, 2021
- 558 views
विकासक प्रफुल्ल गोरे व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल
कल्याण ।। महापालिकेच्या डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगर चौकात सरकारी जागेवर सुरु असलेले अनधिकृत बांधकाम 22 तासाच्या अखंड कारवाई अंती आज सकाळी 8.00 च्या सुमारास अखेर जमिनदोस्त करण्यात आले.
सदर बांधकाम अनधिकृत घोषित केल्याने ते सात दिवसात स्व:खर्चाने काढून घेणेबाबत यापूर्वीच बांधकामधारक श्री. प्रफुल्ल गोरे यांस नोटीस बजावण्यात आली होती, परंतू त्यांनी हे बांधकाम काढून न घेतल्यामुळे काल विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, सहा. आयुक्त (अबानि)सुहास गुप्ते, 3/क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे, 6/फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील, , 10/ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार, 5/ड प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल आणि 8/ग प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांच्या समक्ष उपस्थितीत सदर बांधकाम निष्कासनाची कारवाई सुरु करताच बांधकाम धारक प्रफुल्ल गोरे व त्यांच्या समवेत असलेल्या जमावाने कारवाई करण्यास विरोध केला आणि कारवाई करणेकरीता आणलेल्या 3 ब्रेकर,जे.सी.बी मधली हवा काढून टाकली, पोकलेन यंत्र कारवाईच्या ठिकाणी पोहोचण्या मध्ये घारडा सर्कल येथे गुंड पाठवून अडथळा करण्याचा प्रयत्न केला , महापालिकेच्या कारवाईस अडथळा निर्माण केल्यामुळे 8/ग प्रभागक्षेत्र अधिकारी संदिप रोकडे यांनी बांधकामधारक प्रफुल्ल गोरे व अन्य काही जणांवर रामनगर पोलिस स्थानकात मध्यरात्री गुन्हा दाखल केला.
तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी एखादी मिळकत खरेदी करतांना महापालिकेकडून सदर मिळकतीबाबत खातरजमा करुनच खरेदी करावी आणि होणारे संभाव्य नुकसान टाळावे.
रिपोर्टर