
आर एस पी युनिट चे महत्वपूर्ण योगदान.. पूरग्रस्त नागरिकांना स्वामीनारायण ट्रस्ट च्या सौजन्याने 2000 लोकांना भोजन वाटप ...
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 28, 2021
- 497 views
भिवंडी।। मुसळधार पावसामुळे संपूर्ण कल्याण परिसर जलमय झाला आहे. अशा परिस्थितीत कल्याण ,शहाड, आंबिवली, सांगळेवाडी, गोविंद वाडी, दुर्गाडी पत्री पूल, बापगाव परिसरातील नागरिकांना पूरसदृश स्थिती मुळे खूप भयानक भितीदायक वातावरण निर्माण झाले होते,अशा परिस्थितीत आर एस पी अधिकारी युनिट कमांडर मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी संस्था संस्थापक निलेश ठोंबे, आर एस पी अधिकारी जितेंद्र सोनवणे, बाळासाहेब भोसले, छोटू अहिरे, किरण वसईकर, यांच्यासह तरुण मंडळाने अनेक कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढण्यात मदत केली व काही भागात चार ते पाच फूट पाणी व काही भागात त्यापेक्षाही जास्त पाणी साचले होते अशा ठिकाणी भावी संस्था आणि समाजसेवक यांच्या सहकार्याने नागरिकांच्या मनातील भीती काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अशा परिस्थितीत पूरग्रस्त कुटुंबांना उपासमार होऊ नये म्हणून स्वामीनारायण ट्रस्टचे संचालक दिनेश भाई ठक्कर यांच्या सौजन्याने 2000 लोकांना भोजन वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी समाजसेवक रोहिदास गायकर, गायत्री महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती गायकर, नितील चंदेईया , रोटी डे ग्रुपचे तरुण नागडा, मनसे अध्यक्ष रुपेश भोईर यांनी मोलाचे सहकार्य केले. आणि परिश्रम घेतले.
रिपोर्टर