
कोल्हापूर येथे कोविड सेंटर मधील डॉक्टर व परिचारिका यांचा सत्कार....
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 28, 2021
- 491 views
भिवंडी ।। युनिव्हर्सल ह्यूमन राईट्स कौन्सिल भारत च्या कोल्हापूर जिल्हा टीम यांच्या वतीने UHRC चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरूण बंकोलिया राष्ट्रीय महिलाअध्यक्षा डॉ.सुमनजी मौर्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सकपाळ,महिला अध्यक्षा सुवर्णा कदम यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कोव्हिड सेंटर मधील डाॅक्टर व परिचारिका यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष रणजित बामणे यांनी केले होते.कुरुकली येथील कोव्हीड सेंटरमध्ये डॉ.रोहित पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश महासचिव रामदास पोवार यांच्या हस्ते करण्यात आला तसेच डॉ.अशिष कांबळे,परिचारिका साऊताई कांबळे,सविता पाटील ,यांचा सन्मान चिन्ह व कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच भोगावती येथील कोव्हीड सेंटरमध्ये डॉ.अनिल कातिवले यांना सन्मान चिन्ह व कोविड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच डॉ.सुर्याजी पाटील यांना सन्मान चिन्ह व कोविड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महासचिव रामदास पोवार,जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बामणे,जिल्हा संघटक मंत्री प्रा.शरदचंद्र बोरवडेकर,तसेच भरत कांबळे,मंगेश भोसले,संभाजीदादा पोवार,सामाजिक कार्यकर्ते सागर बेलेकर तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रिपोर्टर