कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फ प्रभागात 4 दुकानाकडून रु.20000/- दंड वसूल

कल्याण ।। महापालिका क्षेत्रात कोरोना  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहे.   त्याअनुषंगाने  फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत  पाटील व त्यांच्या पथकाने आज फ प्रभागातील पॅरिस फर्निचर, गणेश टी अन्ड कोल्ड्रींग, जयमाताजी रेडीमेड स्टोअर्स, मामाज गुलशान ज्युस सेंटर या 4 दुकानांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे  प्रत्येकी रु. 5000/- प्रमाणे  रू. 20,000/- ( अक्षरी वीस हजार रूपये मात्र) इतका दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे  कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे डिलक्स वाईन शाॅप हे  दुकानदेखील सिल करण्याची  कारवाई करण्यात आली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट