कल्याण विभागातून आपत्कालीन परिस्थितीस औषध पुरवठा मदत.

भिवंडी। ठाणे जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्राला पुराचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी झाली आहे .विशेषतः संपूर्ण कोकण रत्नागिरी रायगड चिपळूण या भागात अतिवृष्टी होऊन नागरिकांचे कष्टकऱ्यांचे छोट्या-मोठ्या लढू उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे चित्र पाहताना डोळ्यातून पाणी येईल अशीच पूरग्रस्त  बांधवांची यशोगाथा झाली आहे. समाजाचे आपण ही कोणी देणे लागतो या भावनेतून राज्यातून विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला अनेक दानशूर मंडळी समोर आली. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम अशाच सेवाभावी संस्था कार्यासाठी आपल्या कल्याण विभागातील ज्येष्ठ समाजसेवक व कोकण नॅशनल संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय शादअहमद काजी तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर तारीक काजी .डॉक्टर :नेहा काजी. डॉक्टर हमजा काजी यांचे सयुक्तिक अथक परिश्रमाने रायगड व रत्नागिरी  येथील आपत्कालीन ग्रस्तांना वैद्यकीय सामुग्री तथा आवश्यक औषध साठा पुरवठा करण्यात आला. कोकण डॉक्टर असोशियन चे रत्नागिरी व रायगड सभासद यांच्याकडे सदर व मदत कार्य सोपविण्यात आले .त्याकरिता कल्याण शहरातील कराची मेडिकल एजन्सी तसेच मेडिका फार्मा एजन्सी यांनीही मदतकार्यास लक्षणीय हातभार लावला।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट