नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाची मुल्य ख-या अर्थाने जोपासली जातील - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
- Rohit R. Shukla, Journalist
- Nov 26, 2021
- 352 views
कल्याण ।। नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाचे मूल्य खऱ्या अर्थाने जोपासले जाईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले, आजच्या संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले. संविधान दिनानिमित्त आज महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी, माजी महापौर रमेश जाधव शासनाचे निवृत्त उपसचिव आय.एम.मोरे व उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्याच प्रमाणे, या समयी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे दि. 26/11/2008 रोजी मुंबई शहरावर झालेल्या दाहशवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि दहशदवाद्यांशी लढा देताना शहिद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आले, तद्नंतर बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.) यांच्यामार्फत अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतीय संविधान गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जेष्ठ संविधान अभ्यासक व ॲड. विजय निरभवने यांनी उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन केले यावेळी संबोधी सप्तसूर या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय सरकटे आणि समाधान मोरे यांनी केले.
रिपोर्टर