
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त व सद्याचे अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री.प्रवीण आष्टीकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, लेखनी बंद आन्दोलन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Feb 09, 2022
- 891 views
भिवंडी।। अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री.प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 10/02/2022 रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमार्फत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी दिली.शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा,आरोग्य,अग्निशमन आणि विद्युत विभाग ही अत्यावश्यक गटात मोडणारी कामे सुरू राहतील.परंतु ही कामे वगळता इतर कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन कामकाज होणार नाही.शासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरातून जाहीर निषेध नोंदविणे गरजेचे आहे.त्यामुळे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमार्फत पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनास नागरिकांनी सहकार्य करून अश्या विकृत प्रवृत्ती विरोधात आपला जाहीर निषेध नोंदवावा असे आवाहन यावेळी लक्ष्मण गायकवाड यांनी केले.
रिपोर्टर