सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

भिवंडी।।महानगरपालिका सेवेच्या नियमानुसार नियत वयोमानाप्रमाणे व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम, १९८२ चे कलम १०(१) प्रमाणे ६ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेतर्फे कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना निरोप देणेत आला. याप्रसंगी मनपाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर (शिक्षण) व प्रिती गाडे (आरोग्य) यांच्या हस्ते भविष्य निर्वाह निधीचा धनादेश, शाल व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यांत आला.

महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकिय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झालेल्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमध्ये १) ईश्वर लिंगय्या आडेप (कनिष्ठ अभियंता), २) सुनिल सिताराम वगळ (जकात लिपिक), ३) नारायण गोविंद गायकवाड (लिपिक), ४) चंद्रकांत विष्णू आंबवणे (लिपिक), किशोर पोपटराव भदाणे (लिपिक), मेघना गोविंद काळे (रोड कामगार) अशा ६ सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना महानगरपालिकेच्यावतीने आज निरोप देण्यांत आला. याप्रसंगी शहर अभियंता लक्षण गायकवाड, नगरसचिव अनिल प्रधान, विद्युत उप अभियंता सुनिल पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश भट, विवेक मालसे इ. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते।                                 

रिपोर्टर

संबंधित पोस्ट