जागतिक क्षयरोग दीन साजरा, योग्य औषध उपचाराने क्षय रोग पूर्ण बरा होतो,क्षय मुक्त भारत हाच उद्देश साध्य करा - पालिका आयुक्त अजय वैद्य

भिवंडी।। क्षयरोगाबाबत अनेक गैरसमज यापूर्वी होते, पण आता तसे वातावरण राहिलेले नाही. सरकारी दवाखान्यात पूर्ण औषध उपचार घेतल्याने क्षय रोग हा पूर्ण बरा होणारा आजार आहे,याकरिता शासनाचा व पालिकेचा आरोग्य विभाग क्षय रोग दुरीकरण  विभाग हा चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे, आपल्याला 2025 मध्ये क्षय रोग मुक्त भारत करायचा आहे, याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत पुढील वर्षी टी.बी. मुक्त भारत असा कार्यक्रम करा,असे आवाहन पालिका प्रशासक तथा  आयुक्त अजय वैद्य यांनी केले,भिवंडी शहर महानगर पालिका अंतर्गत क्षयरोग दुरीकरण विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम पालिका मुख्यालय आवारात साजरा करण्यात आला त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त नयना ससाणे, उपायुक्त प्रणाली घोंगे,भिवंडी आय.एम.एच्या प्रेसिडेंट उज्वला बर्दापूरकर, स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाच्या अधीक्षिका माधवी पंधारे, पालिका वैद्यकीय विभाग प्रमुख, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर बुशरा सय्यद उपस्थित होत्या. पालिका आयुक्त पुढे म्हणाले की क्षय रुग्णांनी घाबरून न जाता सरकारी दवाखान्यात योग्य उपचार करून घ्यावेत व आपल्या आजारावर  मात करावी, पुढील वर्षी आज दिवस आपण क्षयरोगमुक्त दिवस म्हणून साजरा करूया असा संकल्प करून काम  करूया.

जागतिक क्षयरोगदिनानिमित्त  मनपा कार्यक्षेत्रात क्षयरोग विभाग तथा हुमना एनजीओ सोबत 

क्षयरोग बाबत जनजागृती करिता रॅली काढण्यात आली. तसेच सर्व नागरी  आरोग्य केंद्राच्यावतीने क्षयरोग कसा होतो व त्याचे दुष्परिणाम व त्यावर कशा प्रकारे त्यावर मात करता येते हे  रांगोळी स्पर्धा घेऊन दाखविण्यात आले,  तसेच भिवंडी मनपा अंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थी यांची क्षयरोग जनजागृती बाबत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाध्ये नागरी आरोग्य केंद्रातील  सर्व वैद्यकीय अधिकारी यांना क्षयरोग मुक्त भिवंडी करण्यात करिता प्रोत्साहित केले. 

तसेच सर्व उपस्थित यांना  क्षय रोग मुक्त भारत ही प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा तील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे उत्कृष्ट भाग घेतलेल्या शाळा व नागरी आरोग्य केंद्र यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रचार साहित्याचा एक भाग म्हणून  सत्कार स्वरुपात पेन, डॉक्टर पेन होल्डर, बक्षीसे सर्व भेट वस्तू वर क्षय रोग लोगो  बाबत माहिती देण्यात आली.

तसेच खाजगी वैद्यकीय अधिकारी तथा नि:क्षय मित्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार  पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. 

या कार्यक्रमात यंग खानदेश फाउंडेशन हे नि:क्षय मित्र बनून पाच क्षयरुग्ण दत्तक घेतले व पोष्टीक आहार किटचे वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमात आरोग्य अधिकारी, मा.वैद्यकीय अधिकारी, खाजगी  डॉक्टर,केमिस्ट असोसिएशन, लॅब असोसिएशन, आणि इतर  असोसिएशन व स्वयंसेवी संस्था  नि:क्षय मित्र तसेच क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी ,औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट