
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत,भिवंडी पालिकेत १५ लाभार्थी यांना नियुक्तीपत्र
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Aug 19, 2024
- 538 views
भिवंडी। महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भिवंडी महापालिकेतील विविध पदांकरीता रिक्त जागेवर तात्पुरत्या स्वरूपात शिकाऊ कर्मचारी यांच्या नियुक्तीस सुरूवात झाली आहे. याकरीता ऑन लाईन व ऑफ लाईन यांधून अर्ज प्राप्त झालेल्या अर्जांमधून छाननी करण्याचे काम करण्यात सुरू आहे, आज पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते १५ लाभार्थी यांना कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यामध्ये कनिष्ठ अभियंता बांधकाम स्थापत्य, पाणी पुरवठा यातील ०७, लिपिक ०३, संगणक साफ्टवेअर इंजीनिअर ०३ पदे, उप समाज विकास अधिकारी ०१ असे एकूण १५ नियुक्तीपत्र पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांच्या हसते वाटप करण्यात आली. पालिकेत एकूण 203 जागांची भरती या अंतर्गत करण्यात येणार आहे. छाननी प्रक्रीया सुरू आहे. आज १५ करर्मचारी यांना आदेश देण्यात आले, उरलेले आदेशांची कागदपत्रांची पुर्तता करून एक ते दोन दिवसांत करून सदरचे कामाचे आदेश देण्य़ात येतील अशी माहिती पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांनी दिली. पालिका आयुक्त यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमात या वेळेला पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर अनुराधा बाबर, समाज कल्याण विभाग प्रमुख नितेश चौधरी उपस्थित होते
रिपोर्टर