पडघा टि.ए.पाटील इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के ; मुलींनी बाजी मारली

रिया राजेंद्र जाधव ९९% टक्के गुण मिळवुन प्रथम


भिवंडी।। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( एस एस सी ) एप्रिल २०२१  दहावीच्या निकालामध्ये पडघा येथील टि.ए. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल पुन्हा एकदा 100% लागला.कुमारी रिया राजेंद्र जाधव प्रथम हिला 99% गुण,कुमारी आर्या नितीन म्हात्रे द्वितीय  95.60% गुण,कुमारी अनुश्री दिपक ठाकूर तृतीय  90.60% गुण मिळवु‌न शाळेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकाऊन  या शाळेत मुलींनी बाजी मारली आहे . दहावी च्या परीक्षेस  ऐकुण ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.  त्या पैकी सर्व विद्यार्थी पास होऊन  विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले. प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकावर तीनही मुलींनी बाजी मारली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आमदार शांताराम मोरे,टि.ए.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल पडघा अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे मा.सभापती कुंदन तुळशिराम पाटील यांनी स्वागत सम्मान करु‌न पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच स्व.तुळशीराम आत्माराम पाटील इंग्लिश मीडियम स्कूल कमिटी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.ग्रामीण भागातील शेतक-यांची गरजु मुले शिक्षापासुन वंचित राहु नये यासाठी स्व.तुळशिराम पाटील यांनी स्कूलची स्थापना केली होती.गेली अनेक वर्षापासुन टि.ए. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल शिक्षण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवत असल्याने संस्थेचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी मनोगत  व्यक्त केले .यावेळी स्कूलचे प्राचार्य रामचंद्र थोरात,उपाध्यक्ष शशांक तांबोली,यशवंत गायकवाड,संजय पटेल,अर्चना महाजन,सेजल तांबोली इत्यादी शिक्षक  उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट