२८ गावांचा विकास करण्यापेक्षा भिवंडी मनपाचा विकास करा - किशोर पाटील

दोन दिवसाच्या पावसाने भिवंडीचा विकास पाहायला मिळाला

भिवंडी।। भिवंडी तालुक्यातील सक्षम असणाऱ्या २८ ग्रामपंचायतींचा भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये विस्तार करण्याचा शासन निर्णय आठ दिवसापूर्वी पारित झाला.व ग्रामीण भागातील भूमिपुत्र पेटून उठला. गेल्या अनेक वर्षापासून सदर प्रस्ताव हा प्रलंबित होता मात्र भिवंडी शहरातील यंत्रमाग उद्योग हा डबघाईला  गेल्यामुळे भिवंडी महापालिकेला मिळणारा महसूल उत्पन्न कमी झाला असल्यामुळे सदर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातच भिवंडी महानगरपालिकेवर कोटी रुपयांचे कर्ज असल्याने ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सदन ,सक्षम,व महानगरपालिकेला लाजवेल अशा विकसित झाल्या आहेत.त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते,गटारे,फेवर ब्लॉक, शौचालये, पाणी पुरवठा,स्वच्छता वेळेवर होत आहे. त्यातच गावातील  सुशिक्षित तरुणांना नोकरी ही मिळत आहे.प्रत्येक गावाची ओळख ही गावाच्या प्रवेशद्वारापाशी मोठमोठ्या स्वागत कमानी बनऊन  गावाला शोभा वाढवून गाव स्वच्छ सुंदर बनवण्यात यशस्वी झाल्या आहेत.आजच्या घडीला एकाही गावात गटारे,नाले भरून वाहत आहेत,ते कुठेच तुंबलेले दिसत नाहीत.व अशा विकसनशील गावाचा महानगर पालिकेत समावेश करणे म्हणजे प्रत्येक गावावर अन्याय केल्या सारखे वाटते असे म्हणायला वावग ठरू नये. आज भिवंडी महानगरपालिकेतील गटारे ,नाले, रस्ते व  ब्रिज यांची अवस्था पाहिली तर शरमेने मान खाली घालावी लागते.दोन चाकी,तीन चाकी,व चारचाकी वाहने चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.व अशा रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत.त्यामुळे अगोदर पहिले भिवंडी महानगरपालिकेचा विकास करून महानगरपालिकेचा कायापालट करावा व एक नवीन इतिहास घडवावा त्यानंतर भिवंडीतील ग्रामीण भागातील सक्षम असलेल्या ग्रामपंचायती तथा गावे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करावी असे आवर्जून सांगावेसे वाटते.

सध्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने सर्वांची झोप उडवून दिली आहे त्यामध्ये भिवंडी महानगरपालिकेची गटारांची साफसफाई योग्य वेळी झाली असती तर आज भिवंडी जलमय झाली नसती व गोरगरीब जनतेला नाहक त्रास झाला नसता आज अनेक भागांमध्ये,घरामध्ये, कंबर भर पाणी जमा झाले आहे.सर्व झोपड्या,दुकाने, जलमय  होऊन नागरिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही आहे त्यामुळे ही बिकट परिस्थिती नागरिकांवर ओढवली आहे.सद्य स्थितीत असलेली महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कमी पडत आहे म्हणून भिवंडी ग्रामीण भागातील २८ गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्याचा विचार सध्यातरी शासनाने सोडून द्यावा असे मला वाटते.याउलट मी असे सांगेन की ज्या ग्रामपंचायती पूर्ण सक्षम आहेत त्या ग्रामपंचायतींना नगरपंचायती मध्ये रूपांतरित करून घ्यावे,तसेच आताच तहसीलदार अधिक पाटील यांनी ज्या १९ गावांना  महसूल गाव म्हणून जाहीर केले त्या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा जेणेकरून प्रत्येक गावाचा विकास हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरात लवकर करता येईल. नाहीतर आज सर्व भुमी पुत्र एकवटले आहेत.जर हा प्रस्ताव पारित केला तर मोठे आंदोलन करण्यासाठी सर्व जण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.माझी भिवंडीचे लोकप्रिय खासदार तथा नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री (पंचायत राज) मा.कपिल पाटील साहेब यांना विनंती आहे की आपणाला ग्रामपंचायतीचा गाढा अभ्यास आहे.व शासनाला,प्रशासनाला कसे हाताळावे हे चांगले ज्ञात आहे.त्यामुळे आपण अधिवेशन झाल्या नंतर आपल्या लोकसभा क्षेत्रातील गावांना या शासन निर्णया पासून कसे वाचवता येईल याकडे प्रामाणिक पणे लक्ष घालावे एव्हढेच ....,असे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री किशोर बळीराम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट