
हर घर दस्तक"या मोहिमेअंतर्गत महापालिका परिसरात आता पर्यंत45,901 कोविड लसीकरणाचा टप्पा पूर्ण
- एबी न्यूज, वार्ताहार
- Nov 13, 2021
- 490 views
कल्याण ।। महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 9,21,889 नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतला असून एकूण 5,26,462 नागरिकांनी लसीकरणाचे दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण 14,48,351 इतका लसीकरणाचा टप्पा महापालिकाने आतापर्यंत पार केला आहे कोविड रुग्ण संख्येवर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने कोविड लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार "कवच-कुंडल मिशन" आणि "युवा स्वास्थ कोविड मिशन" अशा योजना महानगरपालिका क्षेत्रात राबवून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू ठेवला आहे आणि आता "हर घर दस्तक" या कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणा पासून वंचित राहिलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करुन त्यांच्यात लसीकरणा विषयी जनजागृती करुन त्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. या "हर घर दस्तक" मोहिमे अंतर्गत मध्ये आतापर्यंत 7,695 नागरिकांनी कोविड लसीकरणाची पहिली मात्रा, 38,206 नागरिकांनी कोविड लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली असून एकूण 45,901 कोविड लसीकरण या मोहिमेअंतर्गत पार पडले आहे.
तरी "हर घर दस्तक"या मोहिमेअंतर्गत आपल्या घरापर्यंत येणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य पथकास, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या आपल्या घरातील आप्तेष्टांची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.
रिपोर्टर