भिवंडी शहरातून बॅडमिंटन खेळाडू पुढे यावेत...पालकमंत्री एकनाथ शिंदे

भिवंडी।। महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या संकल्पनेतून नाना नानी पार्क येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्व धर्मवीर आनंद दिघे बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते  केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 मे  रोजी संपन्न झाले. या प्रसंगी व्यासपिठावर अध्यक्ष म्हणून महापौर प्रतिभा पाटील, आमदार महेश चौगुले, आयुक्त विजयकुमार म्हसाळ, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, सभागृह नेते सुमित पाटील, प्रभाग समिती 2 चे सभापती प्रशांत लाड, माजी महापौर विलास आर.पाटील,,जेष्ठ नगरसेवक मदन बुवा नाईक,बाळाराम चौधरी,मनोज काटेकर,  संतोष शेट्टी,विकास निकम,  शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने, यांच्यासह   नागरीक, पालिका अधिकारी उपस्थित होते। यावेळी उद्घाटन करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे बॅडमिंटन कोर्टवर व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला. आपल्या या उद्घाटनपर भाषणात पालक मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुलांमध्ये कल्पकता असते त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची सर्वांची जबाबदारी असते त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक तरच खेळाडू पुढे येतील.क्रीडा क्षेत्रासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची मदत नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत यामध्ये क्रीडांगण उभारणीसाठी करण्यास कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करीत जिल्ह्यातील इतर शहरांच्या मानाने भिवंडी क्रीडा क्षेत्रात मागे आहे , बॅडमिंटन क्रीडाप्रकार यातून  भिवंडी शहरातून नवीन खेळाडू उदयास यावे अशी आशा याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे आवश्यक  अशा प्रस्तावांना  राज्य शासन तात्काळ मंजुरी देणार असेही पालक मंत्री. यांनी नमूद केले. तर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, ज्याने जीवनामध्ये आयुष्यभर धर्माचं पालन केलं आणि समस्त समाजाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आज या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट होत आहे हे निश्चित भिवंडी शहरासाठी भूषणावह बाब असून या ठिकाणाहून राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारे क्रीडापट्टू निर्माण व्हावेत अशा शुभेच्छा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री  कपिल पाटील यांनी देत स्व दिघे साहेबांचे जसे भिवंडी शहरावर प्रेम होते तीच परंपरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली असल्याचे सांगत त्यांनी शहरातील विकास कामांना सुध्दा सढळ हस्ते मदत करावी अशी अपेक्षा कपिल पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात महापौर प्रतिभा पाटील यांनी असे नमूद केले की, बॅडमिंटन खेळाची तरुणांना   आवड आहे  पण शहरात बॅडमिंटन कोर्ट नसल्यामुळे त्यांना खेळता येत नव्हते या तरुणांची ही इच्छा महापालिकेच्या मार्फत आम्ही पूर्ण केली आहे, जास्तीत जास्त तरुण खेळाडूंनी या बॅडमिंटन कोर्टाचा लाभ घेऊन भिवंडी शहराचे नाव क्रीडाक्षेत्रात पुढे आणावे असे आवाहन देखील महापौर प्रतिभा पाटील यांनी याप्रसंगी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आयुक्त यांनी या बॅडमिंटन कोर्टवर झालेला खर्च व सदरचे काम कसे झाले याचे विश्लेषण केले. उपआयुक्त दीपक झिंजाड यांनी उपस्थित सर्व आभार मानले।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट