
भिवंडी तहसील कार्यालय, तलाठी सजा, भिवंडी साठी क्रीडा संकुल उभारणीसाठी आमदार महेश चौघुले यांची मागणी
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Aug 06, 2022
- 497 views
भिवंडी ।। भिवंडी तालुक्यातील शासकीय इमारती प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय नव्या जागेत उभारणी करिता आज मा. जिल्हाधिकारी, ठाणे. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीत भिवंडी तहसील कार्यालयात जागे अभावी लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच महत्वाची कार्यालये एकच ठिकाणी व्हावी अशी मागणी आमदार महेश चौघुले यांनी केली होती त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.भिवंडी शहरात शासनाच्या जागा उपलब्ध असून याठिकाणी भव्य अस तहसील कार्यालय उभारल्यास त्याठिकाणी जागेची समस्या दूर होईल व लोकांना एकाच ठिकाणी कामासाठी अधिकारी भेटतील. तसेच अनेक कार्यालय भाड्याच्या जागेत असून ती ही याठिकाणी घेतल्यास शासनाचा पैसे वाचेल अशी मागणी आमदार महेश चौघुले यांनी केली. तसेच भिवंडी तालुक्यातील तलाठी सजा देखील भाड्याच्या जागेत असून शासनाच्या जागा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तलाठी सजा इमारती उभराव्यात अशी चर्चा देखील या बैठकीत करण्यात आली. ३० तलाठी सजा उभारणीसाठी चा प्रस्ताव तयार केला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल असे मा. जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.तसेच भिवंडी तालुका क्रीडा संकुल साठी १३ एकर जमीन सोनाळे येथील उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच सुसज्ज क्रीडा संकुल याठिकाणी उपलब्ध होईल.तसेच भिवंडी तालुक्यासाठी पॉलिटेक्निक कॉलेज ची आवश्यकता असून यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे गेली अनेक वर्षे हा प्रश्न रखडलेला असून लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मा. जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांना दिले.सदर बैठकीस आमदार महेश चौघुले, जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर, उप जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे, भिवंडी उप विभागीय अधिकारी श्री. बाळासाहेब वाकचौरे, भिवंडी तहसीलदार अधिक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी, भिवंडी पंचायत समिती माजी सभापती श्री. गजानन असवारे, श्री. रवी सावंत, भिवंडी मनपा चे अधिकारी. आदी विविध विभागाचे अधिकारी सदर बैठकीस उपस्थित होते.
रिपोर्टर