भिवंडीत टिश्यू पेपरपासून बनलेली १४ फुटी मूर्ती होणार विराजमान नामदेव शिंपी समाज युवा मंडळाचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव

भिवंडी।। सध्याच्या तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्व पटल्याने त्यांनी  पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करीत समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा विचार घेऊन गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भिवंडीतील नामदेव शिंपी समाज युवा मंडळाच्या मंडपात या वर्षी १४ फुटी टिश्यू पेपरने साकारलेली गणेशमूर्ती विराजमान होणार आहे.श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज युवा मंडळ आणि श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बाजारपेठ पारनाका येथील नामदेव मंदीराच्या जागेत दरवर्षी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून या वर्षी ११ वे वर्ष साजरे करीत आहे. या वर्षी १५ हजार टिश्यू पेपर, डिंक आणि तुरटीचा वापर करून १४ फूट उंचीची मूर्ती या मंडपात विराजमान होणार आहे. या मूर्तीचे वजन १२५ किलो असून वांगणी येथील मूर्तिकार पांडुरंग मयेकर यांनी हि मूर्ती घडविलेली आहे. मूर्तीचे वजन जास्त असल्याने मूर्तीला मजबुतीपणा आलेला आहे. म्हणून उघड्या टेम्पो मधून मूर्तीचा सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास सहजपणे झाला. मंडळाने पूजेची मूर्ती देखील टिश्यूपेपरची आणली असून मूर्ती सभोवतालचा पर्यावरण पूरक देखावा गणेश भक्तांना पाहावयास मिळणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. भिवंडी शहरात अशा प्रकारची मूर्ती प्रथमच विराजमान होत असल्याने गणेशभक्तांची व पर्यावरण प्रेमींचे आकर्षण ठरणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट