
सेवा पंधरवडा निमित्त पालिकेत विशेष शिबिराचे आयोजन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Sep 24, 2022
- 259 views
भिवंडी।। राज्य शासनाच्या आदेशाने दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत देखील सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने सोमवार दिनांक 26/09/2022 रोजी सकाळी दहा ते दोन या वेळात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागरिकांशी मुख्य निगडित असे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, आणि मालमत्ता कराचे आकारणी करणे व मागणी पत्र देणे अशी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, तरी ज्या नागरिकांनी 10 सप्टेंबर पूर्वी अर्ज करून वरील कामे पालिकेत प्रलंबित आहेत अशा नागरिकांनी पालिका मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहून आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेणे कामी महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे।
रिपोर्टर