
केंद्र शासन पुरस्कृत “पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेची अंमलबजावणी जलद गतीने होण्याकरिता आयुक्त यांनी घेतली बँकांची बैठक. कर्ज वितरण प्रक्रियेला येणार वेग.
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Dec 22, 2022
- 242 views
भिवंडी।। भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी (PM SVANidhi) योजने नुसार पथविक्रेत्यांना रुपये 10000/- कर्ज तर ज्या पथविक्रेत्यांचे 10,000/- कर्ज मंजूर झाले असून त्यांनी कर्ज परतफेड झाली आहे अशा पथविक्रेत्यांना (PM SVANidhi) योजना टप्पा 2 अंतर्गत 20,000/- कर्ज देण्यात येत आहे. भिवंडी शहरात बँक कर्ज मंजुरी व वितरण याचा दर अत्यंत अल्प असल्याचे निदर्शनास येत असल्याने माननीय प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी भिवंडीतील सर्व बँक व्यवस्थापक यांची बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये त्यांनी ज्या बँकेकडे पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी साठी जे कर्ज प्रस्ताव प्राप्त झालेले अथवा प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तात्काळ मंजुर करण्याबाबतचे कडक निर्देश सर्व बँकांना या बैठकीत देण्यात आले . सदर योजना शासन स्तरावरून प्राधान्य क्रमाने राबवण्याची सूचना असून सदर कामात कोणताही विलंब न होता पथविक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे तरी आपल्याकडील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश यावेळी माननीय प्रशासक तथा आयुक्त यांनी संबंधित बँक व्यवस्थापक यांना दिले.यावेळी उपस्थित बँकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व पथविक्रेत्यांना पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज मिळणार असून आपण सर्व पथविक्रेत्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माननीय प्रशासक तथा आयुक्त यांनी केले. सदर बैठकीत माननीय अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त कर दीपक झिंजाड, प्र.उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, लेखाधिकारी किरण तायडे, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग प्रमुख, व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग तसेच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र भिवंडी ब्रांच, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र नारपोली ब्रांच, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अंजुरफाटा ब्रांच, इंडियन बँक, करूर वैश्य बँक, आयडीबीआय बँक भिवंडी ब्रांच, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, आय डी बी आय बँक अंजुरफाटा ब्रांच व स्टेट बँक ऑफ इंडिया भिवंडी ब्रांच असे 13 बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष बाब
रिपोर्टर