शासन आपल्य़ा दारी सेवेचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा : पालिका आय़ुक्त अजय वैद्य

भिवंडी।। राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या  व महापालिका स्तरावर मिळणा-या सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत, महानगरपालिकेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा अत्यावश्यक नागरिकांसी निगडीत असणा-या  सर्व सेवा आपल्या विभागात येऊन महापालिका पुरवित आहे. महापालिकेत नागरिकांना येण्याचा त्रास होऊ नये, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, नागरिकांची सर्व अत्यावश्यक दाखले, परवाना ई.कामे तात्काळ होणे अपेक्षीत आहे त्या उद्देशाने या शिबीराचे शासन आपल्या दारीचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेऊन घ्यावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन सलाउद्दीन अयुबी शाळेत करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अतिरीक्त आय़ुक्त संजय हेरवाडे, समाज कल्याण उपायुक्त प्रणाली घोंगे, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बाळाराम जाधव, प्रभाग समिती दोनचे सहायक आयुक्त सुधीर गुरव, निवडणूक विभाग सहायक आय़ुक्त नितिन पाटील अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते ।

 आयुक्त पुढे म्हणाले की, राज्य शासनाचा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. ज्यामध्ये नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे.महाराष्ट्र “शासनाच्या शासन आपल्या दारी" या वतीने दि.१६ जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ रोजी पर्यंत सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मालमत्ताधारकांना / मिळकतधारकांना त्यांचे मालमत्ता हस्तांतरण, नव्याने कर आकारणी, वाढीव कर आकारणी (स्वयं मुल्यांकन) करावयाचे आहे. तसेच ज्या नागरीकांना थकबाकी नसल्याचा दाखला, असेसमेंट उतारा, विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशा नगरीकांनी अर्ज व त्यासोबत खालील दर्शविल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह हजर राहुन या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेऊन घ्यावा. असे आवाहन पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. नागरिकांना दैनंदिन कामाकरीता लागणा-या सेवा एकाच ठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. शासन आपल्या दारी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केली आहे. शासन आपल्या दारीचा दैंनदिन कार्यक्रम १)प्रभाग क्र. २- सलाऊद्दीन हायस्कूक, शांतीनगर रोड, येथे दि. १६ ते १७ जानेवारी २०२४ रोजी,२)प्रभाग क्र. १-फ़रहान हॉल, मिल्लत नगर, भिवंडी येथे,दि. १८ ते १९ जानेवारी २०२४ रोजी,३)प्रभाग क्र. ३-व-हाळ देवी मंगळ भवर, कामतघर येथे दि. २२ ते २३ जानेवारी २०२४,४)प्रभाग क्र. ५-गाजेंगी हॉल, कोंबडपाडा, भिवंडी येथे दि. २४ ते २५ जानेवारी २०२४ रोजी व प्रभाग क्र. ४-खुदाबक्ष हॉल, धोचीतलाव स्टेडीयम धामणकरनाका येथे दि. २९ ते ३० जानेवारी २०२४ शिबीराचे  आयोजन सकाळी 10 ते 5 या दरम्यान करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.

(मिलीद पळसूले) माहिती व जनसंपर्क अधिकारी भिवंडी नि. शहर महानगरपालिका

रिपोर्टर

संबंधित पोस्ट