राष्ट्रीय कुष्ठरोग दिना निमित्त रन फॉर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

भिवंडी।। भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय कुष्ठरोग अभियानातंर्गत ३० जानेवारी २०२४ राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हा दिवस कुष्ठरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. या दिना निमित्त आपल्या महानगर पालिका क्षेत्रातील बि.एन.एन महाविदयालय येथे "रन फॉर मॅरोबॉन " चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमास मा.श्री. अजय वैद्य साहेब आयुक्त भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिक, मा. उप आयुक्त प्रणाली घोंगे मॅडम, मुख्य वैदयकिय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद मॅडम, वैदयकिय अधिकारी डॉ. श्री. भागवत दहिफळे साहेब जिल्हा पर्यवेक्षक श्री. महेश निकुभ साहेब, भिवंडी म.न.पा किडा अधिकारी श्री शरद कलावंत अबेदयकिय सहाय्यक श्री दत्तु चव्हाण. अवैदयकिय सहाय्यक श्री रविनाथ सांडुराव जावळे हे व बि.एन.एन महाविदयालयाचे प्राचार्य साहेब, शिक्षक, स्पर्धक हे उपस्थित राहणार आहे.

सदरी स्पर्धा ही दि ३०/०१/२०२४ रोजी सकाळी ८:३० मि. वाजता सुरु होणार आहे मॅरोथॉन चा मार्ग हा खालील प्रमाणे असेल.

मार्ग :- (आरंभ) बि.एन. एन महाविदयालय गेट पासुन, वराळदेवी तलाव मार्ग, मंगल माता भवन, फेनेगाव, आयुक्तायल निवास, वराळ देवी सर्कल,बि.एन.एन महाविदयालय गेट(समाप्त).

रिपोर्टर

संबंधित पोस्ट