भिवंडीतील पत्रकार रेणुका चव्हाण यांचे निधन

भिवंडी।। भिवंडी शहरातून प्रकाशित होणारे बापाचा बाप या साप्ताहिकाच्या संपादिका व अधिस्वीकृती धारक पत्रकार रेणुका संतोष चव्हाण यांचे रूग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या मागे पती पालिका कामगार नेते संतोष चव्हाण मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रेणुका चव्हाण या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.बुधवारी सायंकाळी कामतघर येथील  स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट