"नमो महारोजगार मेळाव्याचे", ठाणे येथे आयोजन

जास्तीत जास्त तरुण युवकांनी लाभ घ्यावा...पालिका आयुक्त अजय वैद्य


भिवंडी ।। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयामार्फत "नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन ठाणे येथे २९/०२/२०२४ व ०१/०३/२०२४ रोजी हायलॅण्ड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) करण्यात येणार आहे. इच्छुक बेरोजगार तरुणांना नोकरी देणे आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देणे हा याचा हेतू आहे.

या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून त्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत असेल, सदर मेळाव्यात बेरोजगारांसाठी विविध पदांसाठी मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी दिल्या जातील. एकुण ६७,९९१ पदांची नोंदणी विविध आस्थापना व उद्योगांकडून केल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये लोडर, पिकर, स्कॅनर, शॉर्ट सर्विस असोसिएट ( अमेझॉन व फ्लिपकार्ट साठी) कस्टमर सर्विस, बीपीओ एजंट, ट्रेनिंग, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप मॅनेजर, हाऊस कॉपिंग, सेल्स एक्झिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर, मोती मेकर, केंद्र मॅनेजर, सर्विस टेक्निशियन, अकाउंट टॅलो, प्रोडक्शन मेंटेनेस इंजिनियर, टेली सेल्स, इलेक्ट्रिक इंजिनिअर, डिझाईन इंजिनिअर, ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर अप्रेंटोशोप, ग्रुप लोडर,  ड्रायव्हर, वर्कर, असोसिएट ऑफिसर, व्यक ऑफिस एक्झिक्यूटिव्ह, डिप्लोमा आणि बी.ई इंजिनिअर, इन्शुरन्स अॅडव्हायझर, एलआयसी एजंट, बिझनेस डेव्हलपर, कंडक्टर अशा अनेक पदांचा समावेश आहे. मुलाखती घेऊन त्याच ठिकाणी रोजगार देण्याचे प्रयोजन आहे. यासाठी दहावी पास/नापास, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ जास्तीत जास्त ह्या लिंक वर नोंदणी करावी व या मेळाव्यात बेरोजगार उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री. अजय वैद्य यांनी केले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट