भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने संत गाडगे बाबा महाराज जयंती साजरी

भिवंडी।। संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंती निमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे तळमजल्यावरील आवारात संत गाडगे बाबा महाराज यांचे प्रतीमेस प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य  यांच्या निर्देशाप्रमाणे अतिरिक्त आयुक्त  संजय हेरवाडे व विठ्ठल डाके यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गाडगे बाबांचा जन्म शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे अशा थोर संताची जयंती भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली. असे उदगार पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,  उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड,  शहर अभियंता सुरेश भट्ट, लेखाधिकारी किरण तायडे, लेखा परीक्षण अधिकारी मयूर हिंगाणे, सहायक आयुक्त नितीन पाटील, फैसल तातली, अजित महाडिक, सुधीर गुरव, प्रभाग अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट