भिवंडीत मतदार जनजागृती साठी बचत गटातील महिलांनी घेतली मतदानाची शपथ

भिवंडी।। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढीसाठी निवडणूक आयोगा कडून मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असून बुधवारी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागामार्फत रामनगर,गायत्री नगर येथील महिला बचत गटांना मतदानाचे महत्त्व सांगून महिलांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण केली व मतदानाची शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमास राष्ट्रीय नागरी उपजीविका विभागातील अमोल केदार व गायत्री नगर रामनगर येथील बचत गटातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट