
मतदार जनजागृती अंतर्गत वेगवेगळे उपक्रम
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Mar 30, 2024
- 155 views
भिवंडी।। 23 भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मतदानाची जनजागृती करण्यात येत आहे, नवीन नवीन मतदारांची नोंदणी, मतदान प्रक्रियेविषयी प्रारूप मतदान केंद्र उभारून मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे मतदाना विषयी विविध माध्यमातून विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे.यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आचार्य अत्रे सभागृह, कल्याण येथे सुरू असलेल्या आचार्य अत्रे यांच्या नाटकांच्या महोत्सवात *१३८- कल्याण पश्चिम* मतदारसंघ अंतर्गत स्वीप पथकाने नाटकासाठी उपस्थित नागरिकांमध्ये मतदानाची जनजागृती केली. तर दुसऱ्या उपक्रमात प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर वतीने स्वीप मतदार जागृती कार्यक्रम व विद्यार्थी मतदार साक्षरता मंच कार्यक्रम घेण्यात आला. माध्यमिक आश्रमशाळा सुसरवाडी , ता. शहापूर, स्वीप मतदार जागृती कार्यक्रम व विद्यार्थी मतदार साक्षरता मंच कार्यक्रम, बुथ अवेअरनेस कार्यक्रम रॅली बुथ क्रमांक 151 शहापूर मतदार संघ अंतर्गत राबविण्यात आलेले स्वीप उपक्रम अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
रिपोर्टर