उमेदवार यांना चिन्ह वाटप

भिवंडी। 23, भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत  दिनांक 6 मे  रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर,  प्रत्यक्ष 27 उमेदवार हे मतदान प्रक्रियेत राहणार आहेत.  दुपारी 3.30 वा. माननीय निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सर्व उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्या करिता बैठक बोलावली त्या बैठकीत चिन्ह वाटप करण्यात आली. चिन्ह  वाटप खालील प्रमाणे

कपिल मोरेश्वर पाटील हे भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय पक्षाचे असल्याने त्यांना कमळ, मुमताज अब्दुल अब्दुल सत्तार हे बहुजन समाज पार्टी चे उमेदवार असल्याने त्यांना हत्ती, सुरेश गोपीनाथ म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गटाचे) यांना तुतारी वाजवणारा माणूस, तर राज्यस्तरावरील पक्ष म्हणून संयुक्त भारत पक्ष अशोक बहादरे..हिरा, न्यू राष्ट्रीय समाज पक्ष कांचन वाखारे.. तुतारी, एम आय एम चे  खान मोहम्मद अक्रम खान.. पतंग., बहुजन महा पार्टीचे दानिश एजाज ...ऊस शेतकरी, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे  मोह कलीम अन्सारी.  फळांची टोपली, अपनी प्रजाहित पार्टीचे सुरेश राम पंडागळे..शिट्टी, भारतीय मानवता पार्टीचे सैफन चांद  दूरध्वनी, तर उर्वरित सर्व अपक्ष उमेदवार यांना त्यांच्या प्रथम पसंती क्रमांकानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये 1.अमिरूल हसन सय्यद . सफरचंद, 2.विशाल विजय मोरे...जेवणाचे ताट, 3.कपिल जयहिंद पाटील फुलकोबी, 4.चंद्रकांत रंभाजी मोटे..कॅमेरा, 5.जाहिद मुक्तार अन्सारी. बॅट , 6.तारा पिंट्या वाघे.दूरदर्शन, 7.निलेश भगवान सांबरे...शिलाई मशीन, 8.मनीष संतोष गोंधळे..अंगठी, 9.मनोज गोवर तुरे.. जहाज, 10.मिलिंद  काशिनाथ कांबळे..गॅस सिलेंडर, 11.शंकर नागेश 

मुटकिरी.. ऑटो रिक्षा, 12.राहुल आशा काठोळे .बॅटरी टॉर्च, 13. रंजना रवि त्रिभुवन.. खाट, 14.वसीम तुफैल सिद्दीकी..किटली, 15.सुरेश सिताराम म्हात्रे..ब्रश,16. सोनाली अशोक गंगावणे.. कपाट,17. हर्षद रमेश म्हात्रे... घन 

अशा अशाप्रकारे सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप  आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी सर्व उमेदवारांना या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाच्या उत्सवात आपण सर्व सहभागी होत आहोत या बद्दल शुभेच्छा दिल्या व चांगल्या प्रकारे प्रचार करा सर्व प्रचार करताना योग्य त्या परवानगी घ्या प्रसिद्धी करता वापरण्यात येणारेबॅनर,  पोस्टर्स, सोशल मीडिया, वाहने  या सर्वांकरिता  सर्व परवानगी घ्या,  आणि मगच प्रचार करा,  परवानगी नसलेला प्रचार हा कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी, अशा  देखील सूचना  निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव  यांनी दिल्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट