भिवंडीतील कुरेशी नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचे मनपा समोर आंदोलन

भिवंडी। भिवंडी शहरातील कुरेशी नगर येथे मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन  याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज महानगर मुख्यालय समोर परिसरातील नागरिकांनी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास एकच गर्दी करत पाणी दो पाणी दो च्या जोरदार घोषणाबाजी करीत  पालिका परिसर दणाणून सोडला होता.सुमारे एक तास सुरू राहिलेल्या या आंदोलनात नंतर पालिका वतीने आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास पाणी समस्या सोडविण्यात बाबत आश्वासन देण्यात आले आहे .

रिपोर्टर

संबंधित पोस्ट