
पालिका कर्मचारी यांचा सत्कार, बकरी ईदच्या काळात पालिका कर्मचारी यांनी फार चांगले काम केले - आय़ुक्त अजय वैद्य
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Aug 16, 2024
- 349 views
भिवंडी। शहरात बकरी ईद सण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या सणात पालिकेतील स्वच्छता आरोग्य, पाणी पुरवठा, मार्केट, वैद्यकीय आरोग्य विभाग, यातील सर्व कर्मचारी यांनी सर्वांनी फार चांगले काम केले त्यामुळे हा सण व्यवस्थितरित्या, चांगल्या प्रकारे पार पडला, त्यामुळे चांगल्या काम करणा-या कर्मचारी यांचा गौरव करणे त्यांचा आवश्यक आहे, असे उद्घार पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी काढले बकरी ईद सणात चांगले काम करणा-या काम १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनांचे ओचित्य साधून चांगले काम करणा-या अशा सर्व अधिकारी, कर्मचा-याचा सत्कार स्व.विलासराव देशमुख सभागृहात करण्यात आला. यामध्ये आरोग्य विभागाचे सहायक आय़ुक्त फैसल तातली, आरोग्य अधिकारी जे.एम.सोनावणे, मार्केट विभाग प्रमुख नेहाला मोमीन अन्य आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांचा समावेश आहे.
पालिका आयुक्त पुढे म्हणाले की शहरात रोजच्या रोज चांगल्या प्रकारे साफसफाई असणे अपेक्षीत आहे. चांगल काम केल्यावर जर आपण सत्कार घेण्यास पात्र आहोत तर जर चांगले समाधानकारक काम नाही झाले तर त्यावर होणा-या कारवाईस देखील आपण जबाबदार राहाल. या पुढे प्रत्येक वार्ड निहाय स्वच्छता स्पर्धा घेण्यात येतील त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देऊन चांगले काम करण-यांचा सत्कार करण्यात येईल जे कर्मचारी काम करणार नाहीत त्यांचे विरोधात नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा ईशारा देखील पालिका आयुक्त यांनी दिला आहे. यावेळी व्यासपिठावर पालिका अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाज कल्याण उपायुक्त डा.अनुराधा बाबर, प्र. शहर अभियंता सचिन नाईक, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटनावर, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त फैसल तातली, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अजित महाडिक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर