
पालिकेतर्फे वाचन महोत्सव
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Sep 03, 2024
- 163 views
विद्यार्थ्याने वाचनाची सवय लावावी ...पालिका आयुक्त अजय वैद्य
भिवंडी। चांगली पुस्तक माणसे घडवतात. चांगली पुस्तक ही आपली चांगल्या मित्राप्रमाणे असतात. कितीही तंत्रज्ञान पुढे गेले तरी वाचनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे विद्यार्थी वर्गाने वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन वाचनाचे सवय अंगी बाळगावी असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले.
महाराष्ट्र शासनाद्वारे भिवंडी पालिकेत समग्र शिक्षा अंतर्गत महावाचन उत्सव २०२४ तालुकास्तरीय खुले ग्रंथ प्रदर्शन पदमश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी येथे मंगळवारी भरवण्यात आलेले होते. सदरचे खुले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केले. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना पालिका आयुक्त यांनी आपल्या जीवनातील पुस्तकाचे महत्व नमूद केले. पुस्तकही आपली जिवलग मैत्री सारखी असतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच वाचनाची सवय आवड निर्माण करावी. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबर अवांतर वाचन देखील करावे. पुस्तक वाचल्याने मनुष्याचे एकाग्रता निर्माण होते. चांगली पुस्तक वाचल्याने मनन व चिंतन चांगल्या प्रकारे होते. एक चांगले पुस्तक आपल्याला घडवत असते आपल्या आयुष्यावर परिणाम करत असते. वाचनातून व्यक्तिमत्व तयार होत असते. त्याचबरोवर पुस्तक वाचनाच्या माध्यमातूनच कशा प्रकारे स्वतःचे आयुष्य घडले याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यासमोर मांडले त्याच प्रमाणे भिवंडी महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकरीता पुस्तकांची यादी देवून विद्यर्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता पुस्तक उपलब्ध करुन घ्यावीत. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनातील पुस्तक पाहून पालिका आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले.सदर कार्यक्रमांतकरीता शिक्षण विभागाचे उपायुक्त बाळाराम जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विभाग प्रमुख स्नेहल पूण्यार्थी , पदमश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे सुधीर घागस, सर्व केंद्र समन्वयक तसेच समग्र शिक्षा कर्मचारी व कार्यक्रम अधिकारी सौ. जयश्री मोगरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रम सुत्रसंचालन सौ. मानसी राजे यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र बोबडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन फार चांगल्या केले होते.
रिपोर्टर