कला फाउंडेशन ठाणे च्या वतीने वळ शाखेला केले सन्मानित

भिवंडी। शिवसेना वळ ची शाखा ही भिवंडी तालुक्यातील एक खुप जुनी शाखा आहे. शिवसेना प्रमुख हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यरत असलेली ही शाखा ,आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार काम करते. शिवसैनिकांना जो मंत्र दिलयं ८०% समाजकारण व २० % राजकारण तो शिवसेना शाखा ,वळ आज सुद्धा आमलांत आणत आहे.

शाखेला ३ शाखाप्रमुख लाभले ,प्रत्येकाचा काळ वेगळा होता,त्यानुसार त्यांनी गावात शिवसेना वाढवली, आज सुद्धा शाखेचे नेतृत्व आमचे शाखाप्रमुख.अनंत भामरे ह्यांनी त्या सर्व शाखाप्रमुखांच्या पावलावर पाऊल टाकून शाखेची शान कायम राखली आहे.

  सुरवातीच्या काळात शाखेच्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांनी खुप संघर्ष केला.त्यांच्या आशीर्वादानेच आज शाखेला काही मान सन्मान मिळाले, पंचायत समिती भिवंडी चे सभापती पद ह विकास अनंत भोईर ह्यांच्या रूपाने तसेच ,सरपंच, उपसरपंच अशी सत्तेची पद आज शाखेतील शिवसैनिकांना लाभत आहेत.

 शिवसेना शाखा वळ गेली ३४ वर्ष वह्यावाटप तसेच शैक्षणिक वस्तुंच वाटप करताना फक्त भिवंडी तालुकाच नव्हे तर रायगड जिल्हा,रत्नागिरी जिल्हा ,व पालघर जिल्हा अशा काही दुर्गम ठिकाणी जाऊन हे वस्तुंचे वाटप करतात.हा एक रेकॉर्डच म्हणावं लागेल.कोरोना सारख्या महामारीत परप्रांतीय बांधवाना अन्न वाटप केलं व त्याना आपले पणाचा आधार दिला

  आज चक्रधारी पाटील हे शाखेचं कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालताना भविष्याचा विचार करून सचिन पाटील ( भिवंडी तालुका सचिव) ह्याच्या रूपाने एक तरूण नेतृत्व पुढं आणलं व त्याला मार्गदर्शन केलं. तसेच सौ.नंदीनी भोईर ह्याना योग्य मार्गदर्शन केलं.अनंत भामरे, बजरंग भोईर,दयाराम पाटील,.निवृत्ती पाटील रविंद्र भामरे.प्रितम भामरे, उदय पाटील ह्या सर्वांसोबत शाखेच्या वरिष्ठांकडून मिळालेला वारसा पुढे चालवत आहेत.या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक कार्यामध्ये पुढे असलेल्या शिवसेना शाखा वळच्या शाखेला सामाजिक सेवा पुरस्कार आज कला फाउंडेशन ठाण्याच्या वतीने प्रदान करण्यात आला

रिपोर्टर

संबंधित पोस्ट