
कु.खुशी नरेंद्र पाटील 95.80 % गुण मिळवून शाळेत मुलींमध्ये प्रथम
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- May 15, 2025
- 147 views
आगाशी, विरार, अर्नाळा एज्युकेशन सोसायटी संचलित
डॉ.एन.पी शहा इंग्रजी माध्यम
आगाशी शाळेचा निकाल 100%
भिवंडी। महेन्द्र कुमार आगाशी, विरार, अर्नाळा एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.एन.पी शहा इंग्रजी माध्यम व पुरुषोत्तम पांडुरंग अलीस, विष्णू अण्णा पाटील ज्युनिअर कॉलेज आगाशी चा एस.एस.सी मार्च २०२५ चा शेकडा निकाल 100%लागला असून विद्यालयाची कु.खुशी नरेंद्र पाटील 95.80 % गुण मिळवून शाळेत मुलींमध्ये प्रथम आली आहे.तर मुलांमध्ये कु.अर्णव सुनील दसादे हा विद्यार्थी 97.40% गुण मिळवून शाळेत मुलांमध्ये प्रथम आला आहे .परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या 152 विद्यार्थ्यांपैकी 152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यापैकी शेकडा ७५ ते ९० च्या दरम्यान 81 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणी 48 विद्यार्थी सेकंड क्लास 22विद्यार्थी व पास क्लास 1 असे एकूण 152 विद्यार्थी पास झाले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
विद्यालयातील पहिले तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे
१)कु.अर्णव सुनील दसादे -97.40%
२)कु.खुशी नरेंद्र पाटील -95.8o%
3)कु.स्वरा सुनील वसईकर 95.60%
!! कु.खुशी पाटील ची यशस्वी वाटचाल....!!
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा मुक्काम पाडा ग्रामपंचायत हद्दीमधील आगरी समाजातील श्री. नरेंद्र देवराम पाटील व सौ.पुष्पा नरेंद्र पाटील यांची सुकन्या कु.खुशी नरेंद्र पाटील हिने एस. एस.सी.मार्च 2025 दहावी परीक्षेत 95.80 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीस खुप खूप शुभेच्छा ...
शुभेच्छुक - डॉ. किशोर बळीराम पाटील संपादक
सौ.संगीता किशोर पाटील शाखाधिकारी - सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था भिवंडी
आमचा विश्वास सार्थ ठरवला - सौ.पुष्पा पाटील
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो.
आमची कन्या कुमारी खुशी नरेंद्र पाटील हिने शालांत परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवून प्रगतीची कमान उंचावली आहे. व आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे. शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल असं म्हटलं जाते. त्यामुळे आमच्या मुलीसाठी ती सांगेल त्या क्षेत्रात आम्ही तिला पाठवून तिची इच्छा पूर्ण करणार, जेणेकरून ती आमच्या कुटुंबाबरोबर आमच्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल असे खुशीच्या आई-वडिलांनी दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले..
रिपोर्टर