
दाभाड जिल्हा परिषद गटात शिवसेना व युवा सेनेच्या २१ शाखांचे उदघाटन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 19, 2021
- 378 views
भिवंडी।। आज दिनांक १८ जुलै २०२१ रोजी भिवंडी तालुक्यातील दाभाड जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल २१ शिवसेना व युवा सेना शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडला. खांबाळा,कुशिवली, पाली, किरवली, राऊत पाडा,जंभिवली, आस्नोली, अस्नोली पाडा, दाभाड,हिवाळी, कोशिंबे, मराडेपाडा, को. व .पागी पाडा ,शेलार पाडा ,आवलोटे, वडाचा पाडा,लाप बुद्रुक,घोलबाव,लाप खुर्द, व खालींग गावात प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवसेना व युवासेनेच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील , तालुका प्रमुख विश्वास थळे , आमदार शांताराम मोरे , उपजिल्हाप्रमुख तथा भिवंडी चे नगरसेवक देवानंद थळे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भुरे, उपतालुका प्रमुख रविकांत पाटील , शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी, जय भगत, दीपक पाटील, मजूर फेडरेशन चे अध्यक्ष पंडित पाटील, महिला संघटक कला ताई शिंदे,उपतालुका प्रमुख नितीन जोशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना भिवंडी तालुका सहसंपर्क प्रमुख विशु भाऊ म्हात्रे,उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील,युवा सेनेचे तालुका अधिकारी अतिष भामरे व इतर शेकडो शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांच्या प्रमुख विशेष उपस्थिती मध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.शिवसेनेचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख राजु भाऊ चौधरी,उपतालुकाप्रमुख भरत शेलार, उप तालुकाप्रमुख हनुमान पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी शिवसेना-युवासेना शाखांचे उद्घाटन पार पडले. शिवसेना युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात मध्ये भर पावसात देखील प्रचंड उत्साह दिसून आला.
रिपोर्टर