जितेंद्र दगडू सकपाळ यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सर चिटणीस पदी नियुक्ती...

भिवंडी: हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने  शिवसेना पक्षप्रमुख   व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, व युवासेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना नगरसेवक  सुरेश (तुकाराम) पाटील  यांच्या सल्ल्यानुसार सदर संघटना मजबूत करण्याचे व शिवसेनेची धेय, उद्दिष्टे जोपासणे,समाजकारण, गोरगरिबांची सेवा,कला क्रीडा क्षेत्रास मदत करणे या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा.आमदार दगडू दादा सकपाळ यांचे चिरंजीव व मा.महाराष्ट्र चिटणीस भा.वी.सेना मा. सह चिटणीस भा. का.सेना जितेंद्र दगडू सकपाळ  यांची शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य सर चिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली त्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोज, उपाध्यक्ष दिलिप शिंदे,महाराष्ट्र राज्य सचिव विधानसभा संघटक अवि राऊत,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य अमित देशमुख,युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत मुंबई अध्यक्ष अमोल वंजारे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.जितेंद्र सकपाळ यांची सरचिटणीस पदी  निवड झाल्याने हुयमन राईटस काऊन्सिल भारत ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा कांबे जिल्हा परिषद गटाचे शिवसेना  संपर्क सचिव राजेंद्र रघुनाथ पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांच्यावर आभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट