महानगरपालिका क्षेत्रात अकरा कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोविड लसीकरण
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Sep 05, 2021
- 342 views
भिवंडी।। दिनांक ६ सप्टेंबर २०२१ पासून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अकरा कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आॕनलाईन व आॕनसाईट रजिस्ट्रेशन द्वारे कोविड लसीकरण करण्यात येईल. ज्या मध्ये (१).खुदाबक्ष हाॕल शेजारी टावरे स्टेडियम, (२) भाग्यनगर आरोग्य केंद्र, शाळा क्रमांक ७५, ( ३) मिल्लतनगर आरोग्य केंद्र, (४)इंदिरा आरोग्य केंद्र, स्व. मिनाताई ठाकरे हाॕल,(५) नवीवस्ती आरोग्य केंद्र, शाळा क्रमांक ८५, (६)भादवड, शाळा क्रमांक ५१, (७) अंजूरफाटा आरोग्य केंद्र, (८) कामतघर गांव आरोग्य केंद्र, (९) पद्मानगर आरोग्य केंद्र,हिंदी शाळा, (१०) पिली स्कूल क्रमांक २७, आणि (११) मनपा शाळा क्रमांक ७० या कोविड लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोविड लस् टोचण्यात येईल. नागरिकांनी स्वतःच्या मोबाईल फोनद्वारे https://www.cowin.gov.in या साईटवर आॕनलाईन रजिस्ट्रेशन करावे व आपल्या सोईचे लसीकरण केंद्र निवडून त्यावर क्लिक केल्यावर त्या मोबाईलवर लसीकरणासाठी निवडलेल्या केंद्रावर किती वाजता यायचे त्याचा मेसेज येईल. तो मेसेज त्या लसीकरण केंद्रावर दाखवून कोविड लस घ्यावी. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येतांना योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क घालावा, रांगेत दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे व लस टोचल्यावर अर्धा तास तेथे आॕब्झर्वेशन कक्षात बसावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. तसेच ज्यांची दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेली आहे परंतु अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनी त्वरीत दुसरा डोस घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर