मनसेतर्फे उत्सव प्रकाशाचा हा विद्युत रोषणाईचा कार्यक्रम संपन्न

कल्याण ।। दिवाळीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा हा मनसेतर्फे विद्युत रोषणाईचा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवरील आयोजित करण्यात आला होता. मनसे आमदार राजू पाटील यांच्याहस्ते स्विच दाबून या परिसरातील विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली.

दिवाळी सण सर्वांचा आहे. कोणत्या एकट्या पक्षाचा नाही. पोलिसांनी 149 ची आम्हाला नोटीस पाठवली, हा दोष आम्ही पोलिस प्रशासनाला देत नाही. सत्ताधारी उठसूट आदेश देत असतात. स्वतःची रेषा मोठी करा, दुसऱ्याची रेषा लहान करून काय मिळणार, असा सवाल करत आमदार राजू पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांपैकी कुणाचेही नाव न घेता सल्ला दिला. सणात आम्हाला गोडवा आणायचाय, त्यामुळे आम्ही आमचे तोंड कडू करणार नसल्याचेही ते म्हणाले.

गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आपल्याला सणही व्यवस्थित साजरे करता येत नव्हते. फडके रोड आणि आप्पा दातार चौक याठिकाणी दिवाळी काळात तरूणाईची लाट येते. डोंबिवलीसाठी या फडके रोडचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे महत्व असून यंदा कोणत्याही संस्थेतर्फे याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर आम्ही पुढाकार घेऊन मनसेतर्फे हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट