
स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत, स्वच्छता पंधरवड्यानिमित्त भिवंडी महानगरपालिकेचा प्लॉग रन. शहर स्वच्छता व प्लास्टीक निर्मुलन करणे हे नागरीकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे -- प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Oct 01, 2022
- 350 views
भिवंडी।। स्वच्छ भारत, सुंदर भारत करण्यासाठी महानगरपालिकेने स्वच्छतेविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी व शासनाच्या स्वच्छतेसह सर्वच कार्यक्रमांत नागरीकांचा सहभाग असणे ही भविष्याची गरज झालेली आहे. त्यामुळे नागरीकांनी अशा सर्व शहर व देश विकासाच्या, भारत स्वच्छ, सुंदर व सक्षम बनविण्याच्या कामांत मनापासून सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. स्वच्छतेची जबाबदारी मनपा कर्मचा-यांची जरी असली तरीही आपआपले घर, परिसर साफ ठेवणे हे आपण भारताचे नागरीक असल्याने स्वच्छतेबाबत आपण अत्यंत जागृत होणे महत्वाचे असून, ती आपली प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारीदेखील आहे. या जबाबदारीचे भान ठेऊन प्रत्येक नागरीकांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे असे प्रतिपादन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नुकताच महानगरपालिकेने स्वच्छतेविषयी आयोजित केलेल्या प्लॉग रन कार्यक्रमाच्यावेळी केले. त्यांनी पुढे असे सांगतिले की, स्वच्छ भारत अभियान नागरी २.० ची वर्षपूर्ती व स्वच्छ भारत अभियानाची ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, नवी मुंबई मार्फत दि. १७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोंबर २०२२ हा स्वच्छ अमृत महोत्सव साजरी करीत असतांना भिवंडी महानगरपालिकेने नुकताच इंडियन स्वच्छता लीग या कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर आज शहरामध्ये या स्वच्छतेच्या पंधरवड्यानिमित्ताने शहर स्वच्छता व प्लास्टीक वापरांवर बंदी व प्लास्टीकचे निर्मुलन करण्यासाठी नागरीकांमध्ये जाणीव व जनजागृती रुजविण्यासाठी, नागरीकांनी स्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणांत सहभाग होण्याच्यादृष्टीने शिवाजी चौक ते मौलाना अबुल कलाम आझाद मैदान व दिवाणशहा दर्गा ते मौलाना अबुल कलाम आझाद मैदान अशा ठिकाणाहून एकाचवेळी स्वतंत्र्यपणे भिवंडी महानगरपालिकेने प्लॉग रन आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचे समारोप मौलाना अबुल कलाम आझाद मैदान, कोटरगेट येथे करण्यांत आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दीपक झिंजाड, उप आयुक्त (आरोग्य) हे ही उपस्थित होते। प्रशासक तथा आयुक्त म्हसाळ यांनी पुढे सांगितले की, या प्लॉग रन कार्यक्रमापूर्वी भिवंडी महानगरपालिकेने प्रभाग समितीनिहाय स्वच्छतेचे कार्यक्रम करून, याची व-हाळा तलाव परिसराची मनपा अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरीक इ.च्या सहभागाने स्वच्छतेच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. यावेळी क्यूआर कोड व दिलेल्या लिंकनुसार सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविलेला होता. त्यानंतर वा स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. यामध्ये मनपाने रस्त्यांवरील व आजूबाजूचे प्लास्टीक पिशव्या, गुटका, पानपराग चे रैंपल इ.ची मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी साफसफाई करुन घंटागाडीमार्फत प्लास्टीक कचरा उचलून शहरातील साफसफाई करण्यांत आली. याप्रसंगी व्यावसायिकांकडून प्लास्टीक थैल्यांसंदर्भात पाच हजार रुपयांचा दंडही वसुल करण्यांत आला.
याप्रसंगी दीपक झिंजाड, उप-आयुक्त (आरोग्य) यांनी म्हटले की, याच शहर स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोंबर गांधी जयंतीनिमित्त नागरीकांसाठी कचरा वर्गीकरण जनजागृती मोहीम सुरु करण्यांत येणार आहे. शहर स्वच्छता व सौदर्यीकरण स्पर्धा प्रत्येक शहरातून सुरु होणार असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने या स्वच्छता अभियानांत सहभाग घेणे आवश्यक आहे. पुढील नव्वद दिवसांच्या कालावधीत शहर कचरा मुक्त करण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबविणार आहे. कचरा मुक्त भिवंडी या उद्देशाने आपण यांत सहभागी होत या प्रवासाचे साक्षीदार आपण सर्व बनू या असे आवाहन त्यांनी भिवंडीतील नागरीकांना शेवटी केले.
रिपोर्टर