निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी एक खिडकी योजना कार्यान्वित

आवश्यक, परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार .... निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव 

भिवंडी।। 23, भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत  सर्व प्रमुख राजकीय पक्ष प्रतिनिधी  यांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली आहे. सद्या उमेदवार नसल्याने राजकीय पक्ष प्रतिनिधी स्तरावर मिटींग  घेण्यात आली. निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची  परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार असा ईशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव  यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख राजकीय पक्ष यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. त्यावेळी  निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव बोलत होते. यावेळेला संबंधीत सहायक निवडणूक निर्णय यांचे कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

 या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षीय प्रतिनिधी यांना सुचना केल्या की नामनिर्देशन पत्र भरताना अचुक भरा, तसेच नामनिर्देशन भरताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्रे भरताना सर्व तपशील व्यवस्थित पुर्ण भरा. उमेदवारांने त्याचे अलिकडील काळात काढलेले तीन फोटो नामनिर्देशन अर्जा सोबत घेवून येणे अपेक्षीत आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार  उमेदवार व राजकीय पक्षाने तीनवेळा प्रिंट मिडीया व इलेक्ट्रानिक मिडिया मधून उमेदवाराची माहितीचे जाहीर प्रकटन करणे आवश्यक आहे. निवडणुकीकरीता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने केलेला सर्व खर्च केंद्रीय निवडणूक निरिक्षक तपासतील. उमेदवाराचा प्रचार सभा, रँली याचे सर्वांचे व्हीडीओ शुटींग करण्यात येणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी लागणारी सर्व प्रकारची वाहने वापरणेकामी  पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाचा खर्च हा स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी निवडणूक निर्णय़ अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच सर्व सहाही सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी किमान तीन दिवस आगोदर अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व  परवानग्या देण्यात येतील. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ईव्हीएम मशीन आणतेवेळी, स्ट्रांग रूम मध्ये ठेवताना उपस्थित राहू शकतात.  कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रसिध्द करणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच समाज माध्यम (सोशल मिडीया)  व इलेक्ट्रानिक मिडीयावर प्रचार करण्यासाठी  मा. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसार माध्यम यांच्याशी संपर्क साधून मा. जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये, तसेच कोणतीही परवानगी नसताना कोणतेही  वाहन वापरता येणार नाही किंवा तसेच कोणताही प्रचार करता येणार जर नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन झाल्यास त्या उमेदवार व पक्षावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट