मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावाचा प्रभाव

डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव, जैन कॉलनीमधील शेकडो उत्तर भारतीय बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पक्षात आलेल्या सगळ्यांचे मंत्री चव्हाण यांनी केले स्वागत

डोंबिवली: शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील  शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावावर प्रभावित होऊन रविवारी जाहीर प्रवेश केला.

मंत्री चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री चव्हाण हे त्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित होते. येथील मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. 

त्यामध्ये प्रमुख अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा अभिषेक सोनू, अभिषेक सिंग नवीन शर्मा, विकास प्रजापती  दर्शन पाटील यांच्यासह शेकडो  कार्यकर्त्यांनी भारतीय  प्रवेश केला.

 त्यावेळी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे  कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,  दत्ता माळेकर, रवीसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर मीतेश पेणकर बाळा पवार उपस्थित होते.

 नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी या प्रवेश संदर्भात काही महिने विशष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी या सगळ्यांचे।विशेष कौतुक केले. संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाउल असून आलेल्या सगळ्यांचे स्वागत असून पक्षात एकदिलाने काम करून शतप्रतिशद भाजप हे ध्येय असल्याचे मार्गदर्शन केले .

रिपोर्टर

संबंधित पोस्ट