उमेदवारी जाहीर होताच विश्वनाथ भोईर यांनी श्रीगणेश, दुर्गाडी देवीसह महापुरुषांचे घेतले दर्शन

उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्ष श्रेष्ठींकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी मिळताच विश्वनाथ भोईर आज सकाळी दुर्गाडी किल्ला येथील श्री गणेश आणि देवी चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह कल्याण परिसरातील तमाम महापुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच सलग दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करत विश्वास व्यक्त केल्याबद्दल शिवसेना पक्ष नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेसह कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेचेही आभार मानले. तसेच हा विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावू असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर उद्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही भोईर साहेब यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी खडकपाडा येथून ते मुंबई विद्यापीठ उपकेंद्रापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात येणार असून त्याद्वारे आपला अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह विधानसभा संघटक / मा.नगरसेवक मयूर पाटील, प्रभूनाथ भोईर, उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, मोहन उगले, विद्याधर भोईर, अंकुश जोगदंड, सुनील खारुक, मा.नगरसेवक जयवंत भोईर, गोरख जाधव, भीमराव डोळस, युवासेना सहसचिव प्रतीक पेणकर, युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे, दिनेश निकम, युवासेना जिल्हा समन्वयक सूरज खानविलकर, युवासेना जिल्हा चिटणीस वैभव भोईर, विभाग प्रमुख अनंता पगार, रामदास कारभारी, रमण तरे, नाना काटकर, शाखा प्रमुख रोहन कोट, रोशन चौधरी, संदीप सांगळे, राजा पाटील, प्रभात मिश्रा, संदीप नहीरे, मेघन सल्पी, किशोर पाटील, राकेश पाटील, विकास भोय, मंदार बेलोटे, विलास रंदवे यांच्यासह अनेक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट