महाड येथील पुरग्रस्थांसाठी १ टन जिवनावश्यक वस्तू रवाना

भिवंडी।। मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्ठीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महापुर आल्याने जनजीवन अस्त व्यस्त झाले.त्यामुळे अनेक कुटूंबांचे घर उध्दस्त झाले.अशा परिस्थितीत महाड येथील गरजु लोकांसाठी भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातील दानशुर नेते सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचे पुतणे युवा उद्योजक रणधीर परशुराम म्हात्रे यांनी महाड येथील पुरग्रस्थांसाठी १ टन जिवनावश्यक वस्तूंचा साठा रवाना केला.त्यामध्ये तांदूळ,डाळ,तेल,मीठ, मसाला,साखर पीठ,हळद इत्यादी वस्तूंचा समावेश आहे ज्या समाजा मध्ये आपण राहतो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे दानशुर नेतृत्व सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन समाज कार्याचा वसा घेणारे युवा उद्योजक रणधीर परशुराम म्हात्रे यांनी पुरग्रस्तांना मदत केली असुन प्रत्येकाने या महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना संकट समयी मदत करावे  असे आवाहन देखील केले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट