कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील 14 आस्थापनांकडून कडून रु. 70,000 दंड वसूल

कल्याण ।। महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे बाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच  दिलेल्या निर्देशानुसार गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली, पाहणी अंती 

 4/जे प्रभागक्षेत्र परिसरात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 आस्थापनांकडून रु. 15,000/- 

 5/ड प्रभागक्षेत्र परिसरात 5 आस्थापनांकडून रु. 20,000/-

 6/फ प्रभागक्षेत्र परिसरात 1 आस्थापनेकडून रु. 5,000/-

 7/ह प्रभागक्षेत्र परिसरात 2 आस्थापनांकडून रु. 15,000/-

 8/ग प्रभागक्षेत्र परिसरात 1 आस्थापनेकडून रु. 5,000/- 

 9/आय प्रभागक्षेत्र परिसरात एका आस्थापनेकडून रु. 10,000/-

या प्रमाणे रु. 70,000/- (अक्षरी  सत्तर हजार रुपये मात्र ) इतका दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे 9/आय प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी मलंग रोड व शीळफाटा रोड या परिसरातील 7 दुकाने कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील केली, तसेच 10/ई प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवण किनारा हे हॉटेल सील करण्याची कारवाई केली. 

तरी महापालिका क्षेत्रात कोरोना साथीस आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून सर्व मंगल कार्यालये /आस्थापना/मॉल/हॉटेल इ.  नी कोविड नियमांचे  कटाक्षाने पालन करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे .

रिपोर्टर

संबंधित पोस्ट